धूम स्टाईलने महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याचे मंगळसूत्र लांबवले

 धूम स्टाईलने महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याचे मंगळसूत्र लांबवलेनगर : नगरमध्ये पुन्हा एकदा धूम स्टाईलने महिलेच्या गळ्यातील दागिने चोरीचा प्रकार झाला आहे. दि.३१ ऑक्टोबर रोजी सावेडी तील जाॅगींग ट्रॅक रोडवर कलानगर चौक परिसरात दुपारी पावणेतीनच्या सुमारास ही घटना घडली. महिला पायी चाललेली असताना दुचाकी वर आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील दीड तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र ओरबाडून काढले व पलायन केले.

याप्रकरणी तोफखाना पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय अधिकारी ढुमे, एपीआय सुंदरसे, पीएसआय सोळंके यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post