जास्त मस्ती आलेल्या भाजपला धडा शिकवणार, तयार रहा....

 जास्त मस्ती आलेल्या भाजपला धडा शिकवणार, तयार रहा....

पक्ष सोडल्यानंतर माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड बरसलेऔरंगाबाद: भाजपला जास्त मस्ती आली आहे आणि त्यांना मी धडा शिकवणारच, असा निर्धार माजी केंद्रीय मंत्री जयसिंग गायकवाड यांनी व्यक्त केला आहे. भाजपला पराभूत करण्यासाठीच मी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतून माघार घेत आहे. भाजप हा पक्ष सध्या हवेत गेला आहे. ते सध्या विमानापेक्षाही जास्त उंचीवर आहेत. मात्र, आता मी भाजपला धडा शिकवणार आहे, त्यासाठी भाजपने तयार राहावे, असा इशारा जयसिंगराव गायकवाड यांनी दिला


मराठवाडा पदवीधर संघातून उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या जयसिंगराव गायकवाड यांनी मंगळवारी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे राजीनामा पाठवून भाजपला सोडचिठ्ठी दिली. यानंतर ते मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील स्वतंत्रपणे दाखल केलेला आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी निवडणूक कार्यालयात आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाजपवर आगपाखड केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post