कोरोनावरील लसीकरणासाठी भारत सरकारने विकसित केलं ‘App’

 


कोविन लसीकरणासाठी भारत सरकारने विकसित केलं ‘App’नवी दिल्ली : करोनावरील लस येत्या दोन तीन महिन्यातच उपलब्ध होण्याची शक्यता असल्याने केंद्र सरकारने लसीकरणाच्या पूर्वतयारीलाही वेग दिला आहे. याअंतर्गत कोरोनावरील लसीबाबतची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भारत सरकारने एक खास ऍप तयार केलं आहे. "कोव्हिन'' असं या ऍपचं नाव आहे. हे ऍप तुम्हाला कोरोना लसीचा साठा, त्याचे वितरण, स्टोरेज याबाबतची माहिती देईल. ही लस जेव्हा दिली जाईल, तेव्हा त्याचे वेळापत्रकही कोव्हिन ऍपवर उपलब्ध होईल. या ऍपच्या माध्यमातून आपल्याला देशभरातील 28 हजार स्टोरेज सेंटरमधील लसींच्या साठ्याविषयची माहिती मिळेल. कोरोना व्हॅक्सिनचा साठा करुन ठेवलेल्या जागेवरील तापमानावरही कोव्हिन ऍपचं लक्ष असेल, या ऍपद्वारे साठा करुन ठेवलेल्या जागेवरील तापमानात होणार्‍या बदलांबाबतची माहिती मिळेल. दरम्यान, तुम्हाला लस कधी दिली जाणार आहे, याबाबतची माहितीदेखील या ऍपद्वारे नागरिकांना मिळेल. तसेच तुम्हाला लस दिल्यानंतर त्याचं प्रमाणपत्रदेखील या ऍपद्वारे तुम्हाला दिलं जाणार. तुम्हाला लस दिल्यानंतर आपोआप या ऍपमध्ये संबंधित प्रमाणपत्र जनरेट होईल.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post