आरोग्यमंत्र्यांनी घेतली करोनाची लस


आरोग्यमंत्र्यांनी घेतली करोनाची लसनवी दिल्ली :  मेड इन इंडिया कोरोना लस  कोवॅक्सिनक्लिनिकल ट्रायलच्या तिसऱ्या टप्प्यात आहे. आतापर्यंत सुरुवातीच्या दोन टप्प्यातील ट्रायलमध्ये सर्वसामान्य नागरिकांचा समावेश होता. मात्र आता पहिल्यांदाच कोरोना लशीच्या ट्रायलमध्ये भारतातील मंत्रीही सहभागी झाले आहेत. देशात पहिल्यांदाच मंत्र्यानं कोरोनाची लस घेतली आहे.

हरयाणाचे आरोग्यमंत्री अनिल विज यांनी कोरोनाची लस घेतली आहे. हरयाणामध्ये आजपासून कोवॅक्सिन लशीचं तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरू झालं. आरोग्यमंत्री विजदेखील या ट्रायलमध्ये सहभागी झाले. राज्यात तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलमध्ये लशीचा पहिला डोस त्यांनी घेतला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post