उपमुख्यमंत्री अजित पवार करोनामुक्त, रूग्णालयातून डिस्चार्ज

 

उपमुख्यमंत्री अजित पवार करोनामुक्त, रूग्णालयातून डिस्चार्जमुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयातून त्यांना 2 नोव्हेंबर रोजी डिस्चार्ज मिळाला. अजित पवार आठवडाभर घरातच विश्रांती करणार आहेत. अजित पवार यांची बहीण आणि खासदार सुप्रिया सुळे यांनीही व्हॉट्सअॅप स्टेटसच्या माध्यमातून अजित पवार कोरोनामुक्त झाल्याचं सांगितलं.


थकवा जाणवत असल्याने अजित पवार चार दिवस होम क्वॉरन्टाईन होते. परंतु कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर अजित पवार यांना 26 ऑक्टोबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आठवडाभर उपचार घेतल्यानंतर आज ते कोरोनातून बरे होऊन घरी परतले.


"राज्यातील कोट्यवधी जनता व कार्यकर्त्यांची प्रार्थना तसंच डॉक्टर,नर्स,सपोर्ट स्टाफच्या प्रयत्नांमुळे मी कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून आज घरी परतलो आहे.डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार,काही दिवस घरी विलगीकरणात राहणार आहे. माझ्या उत्तम प्रकृतीसाठी सदिच्छा व्यक्त करणाऱ्या हितचिंतकांचे आभार"!, अशा शब्दांत अजितदादांनी सर्वांचे आभार मानले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post