नगरच्या महिलेचं बाळ पळवणार्‍या महिलेला पुण्यात अटक

 नगरच्या महिलेचं बाळ पळवणार्‍या महिलेला पुण्यात अटक



पुणे : एसटीच्या प्रवासात ओळख झालेल्या महिलेने 4 महिन्यांच्या बाळाचे अपहरण केल्याची घटना पुण्यात घडली होती. पण अखेर पुणे पोलिसांनी मोठ्या चातुर्याने या बाळाला आणि त्याला पळवणार्‍या महिलेला शोधले आहे. पुण्याचा हडपसर परिसरात हा प्रकार घडला होता. अहमदनगर ते सातारा या मार्गावरील बस प्रवासादरम्यान झालेल्या ओळखीचा फायदा घेऊन एका महिलेने चार महिन्यांच्या बाळाचे अपहरण केले होते. 23 वर्षीय महिलेने या प्रकरणी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती. फिर्यादी महिलेचे म्हणजे बाळाच्या आईचे नवर्‍यासोबत भांडण झाले होते. याच भांडणाचा राग मनात धरून तिने बाळाला घेऊन घर सोडले होते. लोणी गावातील असलेली ही महिला नगरला गेली. त्यानंतर तिने नगर ते सातारा बसने प्रवास सुरू केला. त्याचवेळी एक महिला त्यांच्या शेजारी सीटवर येऊन बसली. काही वेळाने महिलेने फिर्यादी यांच्याशी गप्पा मारण्यास सुरुवात केली. त्यांच्याशी ओळख वाढवून दोघीही स्वारगेट बस स्थानकात उतरल्या. स्वारगेट बस स्थानकात उतरल्यानंतर या दोघीही हडपसर परिसरात आल्या तेथील एका चायनीजच्या दुकानात दोघींनी जेवण केले. त्यानंतर आरोपी महिलेने बाळाला खाऊ आणण्याचा बहाण्याने फिर्यादी महिलेकडून स्वतःजवळ घेतले आणि ती तिथून गेली ती परत आलीच नाही. पोलिसांनी तपास करताना मिळालेले सीसीटीव्ही फुटेज व्हायरल केले, आजूबाजूच्या लोकांकडे चौकशीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांना मिळालेल्या माहितीत मांजरी भागातील एका सोसायटीत एका महिलेने लहान बाळ आणले आहे. जेव्हा त्या महिलेकडे जाऊन चौकशी केली तेव्हा सुरुवातीला नकार दिला. नंतर मात्र तिनेच बाळ पळवून आणल्याचे समोर आले. पोलिसांनी तिला अटक करण्यात आली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post