रोहिणी खडसे यांना कोरोनाची लागण

रोहिणी खडसे यांना कोरोनाची लागण जळगाव:  एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना कोरोनाची लागण झाली आहे. रोहिणी खडसे यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली आहे. प्रकृती उत्तम असून खबरदारी म्हणून रुग्णालयात दाखल होत असल्याची माहिती खुद्द रोहिणी खडसे यांनी दिली आहे. रोहिणी खडसे या जिल्ह्यातील राजकारणात सक्रीय आहेत. मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. पण त्यात त्यांचा पराभव झाला होता. रोहिणी खडसे यांनी कोरोनाची चाचणी केल्यानंतर आज त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे प्रकृती उत्तम असली तरी खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post