नगर डाक विभागात थेट नियुक्ती, २४ नोव्हेंबरला मुलाखती

 अहमदनगर विभागात डाक जीवन विमा एजंटची थेट नियुक्ती            अहमदनगर दि. 10 :- टपाल जीवन विमा योजना व ग्रामीण टपाल जीवन विमा योजने अंतर्गत असणा-या विविध विमा योजनांच्या विक्रीसाठी विमा प्रतिनिधींची नेमणूक  वरिष्ठ अधीक्षक डाकघर, अहमदनगर विभाग, अहमदनगर यांचे मार्फत थेट नियुक्ती केली जाणार आहे. पुढील नमूद केलेल्या अटीची पूर्तता असणा-या इच्छुक उमेदवारांनी वरिष्ठ अधीक्षक डाकघर, अहमदनगर विभाग, अहमदनगर यांच्या कार्यालयास दिनांक 24 नोव्हेंबर 2020 सकाळी 10 ते 4 या वेळेत मुलाखतीस उपस्थित राहावे.

            शैक्षणिक पात्रता- उमेदवार हा 12 वी पास असणे आवश्यक, मायोवर्यादा 18 ते 60 वर्षे, कोणतयाही कंपनीचे काजी विमा प्रतिनिधी, माजी जीवन सललागार, अंगणवाडी कर्मचारी, महिला मंडळ कर्मचारी, स्वयंसेवी संघअना चालक, माजी सैनिक, निवृत्त शिक्षक, बेरोजगार, स्वयंरोजगार असणारे तरुण, तरुणी किंवा वरील पात्रता असणारे इच्छुक उमेदवार मुलाखतीलस उपस्थित राहू शकतात.

            इच्छुक उमेदवारांनी विमा पॉलिसी विक्रीचा अनुभव, संगणकाचे ज्ञान, स्थानिक भागाची पूर्णत: माहिती असणे अपेक्षित आहे. उमेदवारावर कोणताही गुन्हा, खटला दाखल नसावा. उमेदवाराची निवड 12 वीच्या गुणांवर तसेच उच्च शैक्षणिक पात्रता व मुलाखतीत मिळालेल्या गुणावर केली जाईल.

            मुलाखतीस येताना उमेदवाराने आवश्यक कागदपत्रे - जन्म तारखेचा दाखला, शैक्षणिक पात्रता, आधार कार्ड, पॅन कार्ड, मोबाईल क्रमांक, इ मेल आय डी व इतर आवश्यक कागदपत्रे तसेच या क्षेत्रातील अनुभव असल्यास त्या बाबतची कागदपत्रे घेवुन यावीत असे वरिष्ठ अधीक्षक डाकघर, अहमदनगर विभाग, अहमदनगर यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post