१६ कोटींची फसवणूक, भाजप आमदारावर गुन्हा दाखल

१६ कोटींची फसवणूक, भाजप आमदारावर गुन्हा दाखलऔरंगाबाद:  भाजप आमदार प्रशांत बंब यांच्या सह 16 जणांवर औरंगाबादच्या गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बनावट दस्तऐवज खरे असल्याचे भासवत सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. याबाबत शिवसेनेच्या कृष्णा डोनगावकर यांनी पोलिसात फिर्याद दिली होती. त्यावरुन हा गुन्हा दाखल झाला आहे. सभासदांची तब्बल 15 कोटींची फसवणूक केल्याचा बंब यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. त्यांनी सभासदांचे पैसे स्वत:च्या मित्रांच्या आणि नातेवाईकांच्या नावावर वळते केले असा आरोप कृष्णा पाटील डोनगावकर यांनी केला आहे. याविषयी प्रशांत बंब यांना विचारले असता, राजकीय आकसापोटी आणि बदनामी व्हावी म्हणून हा गुन्हा दाखल केल्याचे त्यांनी म्हटले आहे .ज्यांनी ही तक्रार केली आहे तेच गेल्या दहा वर्षांपासून कारखाना बंद पडावा यासाठी प्रयत्न करत असल्याचे देखील बंब म्हणाले आहेत

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post