पोखर्डी परिसरात बिबट्या दिसल्याची चर्चा, वन विभागाने केला खुलासा

 पोखर्डी परिसरात बिबट्या दिसल्याची चर्चा, वन विभागाने केला खुलासा


प्रातिनिधिक छायाचित्र


नगर - औरंगाबाद रस्त्यावरील पोखर्डी परिसरात मंगळवारी सकाळी बिबट्या दिसल्याच्या अफवेने खळबळ उडाली. 

ढवळे वस्तीवर मुरलीधर देठे यांना सकाळी शेतात वन्यप्राणी दिसला. त्यांना तो बिबट्या वाटला. त्यांनी तत्काळ ही बाब इतरांना सांगितली. 

 वनविभागालाही याबाबत माहिती मिळाल्यावर उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी यांच्या मार्गदर्शनानुसार वन परिक्षेत्र अधिकारी सुनील थेटे, व्याघ्र संरक्षण समिती सदस्य मंदार साबळे, तलाठी गणेश आगळे, वन कर्मचारी जगन्नाथ मुळे यांनी लगेच या परिसरास भेट दिली.

साबळे यांनी ठशांची पाहणी करून तो बिबट्या नसून ते तरस असल्याचे सांगितले. तसेच गणेश आगळे यांनीही ते पाहिले. ते तरस असल्याचे लक्षात आले. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये. 

 तसेच काही दिसल्यास तत्काळ वन विभागाशी संपर्क साधावा, असे वन विभागाने सांगितले. रात्री निर्जन भागात एकटे फिरू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post