जय मल्हार सेनेच्या सरसेनापतींचा काॅंग्रेस प्रवेश

 जय मल्हार सेनेचे सरसेनापती लहू शेवाळे काॅंग्रेसमध्ये दाखलमुंबईः काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी अनेक जण इच्छुक असून, आज धनगर समाजाचे नेते आणि जय मल्हार सेनेचे सरसेनापती लहू शेवाळे  यांनी शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

टिळक भवन येथे लहू शेवाळेंच्या पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, माजी मंत्री नसीम खान, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष मुजफ्फर हुसेन, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव सोनल पटेल, डॉ. वामसी रेड्डी, बी. एम. संदीप, संपतकुमार, आशिष दुआ, मा. आ. मोहन जोशी, औरंगाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कल्याण काळे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post