शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य अनिल कराळे यांचे निधन
नगर : शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषदेतील गटनेते अनिल कराळे यांचे दीर्घ आजाराने आज (दि.13) निधन झाले. ते 41 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या पुण्यातील खासगी रूग्णालयात उपचार चालू होते. ऐन दिवाळीत कराळे यांच्या निधनाचे वृत्त आल्याने शिवसेनेत शोककळा पसरली आहे. त्यांचे मूळ गाव पाथर्डी तालुक्यातील कामत शिंगवे आहे. त्यांच्यापश्चात 2 मुले, आई, पत्नी, भाऊ असा परिवार आहे. ते जिल्हा परिषदेच्या मिरी गटातून विजयी झाले होते.
Post a Comment