ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन : ना.बाळासाहेब थोरात

ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन : ना.बाळासाहेब थोरातमुंबई, दि. ३ : संगमनेर येथील ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्यासाठी आवश्यक असणारा प्रस्ताव सार्वजनिक आरोग्य विभागाने तातडीने तयार करावा, असे निर्देश महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले.


ग्रामीण रुग्णालयाचा उपजिल्हा रुग्णालय दर्जावाढ आणि कॉटेज रुग्णालयाचे महिला रुग्णालयात रुपांतर करणे याबाबतची आढावा बैठक महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित करण्यात आली. या बैठकीस सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, आमदार सुधीर तांबे, आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. साधना तायडे यांच्यासह सार्वजनिक आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


३० खाटांचे महिला रुग्णालय सुरु होणार

संगमनेर नगरपरिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या कॉटेज रुग्णालयाचे रुपांतर महिला रुग्णालयात करण्याचा प्रस्ताव सार्वजनिक आरोग्य विभागास देण्यात आला आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग हा प्रस्ताव अभ्यास करुन येथे ३० खाटांचे महिला रुग्णालय सुरु करण्याच्या कामाला गती देईल, असे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी यावेळी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post