नगर जिल्हा भाजपतून राष्ट्रवादीत इनकमिंग होणार, राज्यातील सरकार पाच वर्षे पूर्ण करणार

 


नगर जिल्हा भाजपतून राष्ट्रवादीत इनकमिंग होणार, राज्यातील सरकार पाच वर्षे पूर्ण करणार

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा दावा, पाथर्डीतील बिबट्याला पकडा किंवा ठार मारानगर : भाजपकडून राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडेल असा दावा केला जात असला तरी आताचे सरकार पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करेल. तसेच भविष्यातही पुढचे पाच वर्ष आमचेच सरकार असेल, असा विश्वास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केला आहे. नगरमध्ये पत्रकारांशी बोलताना तनपुरे यांनी नगर जिल्ह्यातील भाजपचे अनेक नेते राष्ट्रवादीच्या संपर्कात असून लवकरच राष्ट्रवादीत मोठ्या प्रमाणात इनकमिंग होईल, असा दावा केला आहे. 

दरम्यान पाथर्डी तालुक्यात धुमाकुळ घालणार्‍या बिबट्याला नरभक्षक ठरवून त्याला ठार मारण्याचे आदेश द्यावे यासाठी वरिष्ठ पातळीवर मागणी केली असल्याचे तनपुरे यांनी सांगितले. राज्यातील वरिष्ठ अधिकार्‍यांनीही तशी तयारी दाखवली आहे. तसेच आजही मी सर्व प्रक्रियेचा आढावा घेतला आहे. एक तर बिबट्याला पकडा किंवा ठार मारा, असे निर्देश दिले आहेत,’ असेही ते म्हणाले. ’पाथर्डी तालुक्यातील शिरापूर येथे भेट देऊन बिबट्याने ठार केलेल्या मुलाच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत सरकारच्या वतीने दिली आहे. या मुलाच्या कुटुंबीयांच्या नावे दहा लाख रुपये मुदत ठेव ठेवली जाणार आहे. बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू असून बाहेरच्या जिल्ह्यातून तेथे टीम आणल्या आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post