प्राथमिक शिक्षक बँकेचे कार्य कौतुकास्पद - महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात
शिक्षक बँकेचे नवनियुक्त चेअरमन श्री.राजू राहाणे यांचा नामदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते सत्कार संपन्न झाला.याप्रसंगी बोलताना गुरुमाऊली मंडळाच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे कार्य कौतुकास्पद असल्याचे मत महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.
यावेळी शिक्षक नेते भाऊराव राहिंज यांनी शिक्षक बँकेविषयी माहिती दिली तसेच शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांची माहिती ना.थोरात साहेबांना दिली.शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्याचे आश्वासन नामदार साहेबांनी दिले.
याप्रसंगी नवनियुक्त चेअरमन राजू राहाणे यांनी बँकेच्या विविध योजनांची माहिती देत नामदार साहेबांनी केलेल्या सत्काराने आपली जबाबदारी आणखी वाढली असून संगमनेर तालुक्याच्या सहकारी तत्वाला शोभेल असाच कारभार शिक्षक संघ व गुरुमाऊली मंडळाचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब तांबे व तालुक्यातील सर्व शिक्षक सभासदांच्या मार्गदर्शनाखाली करणार असल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष श्री.सुनील ढेरंगे यांनी शिक्षकांच्या वतीने नामदार साहेबांचा सत्कार केला.
यानंतर लगेचच अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या संगमनेर शाखेमध्ये नवनिर्वाचित चेअरमन यांचा पदग्रहण समारंभ संपन्न झाला याप्रसंगी अनेक सभासद बांधवांनी मनोगत व्यक्त करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आणि पदग्रहण समारंभ पार पडला.
याप्रसंगी मार्गदर्शक पी.डी.सोनवणे,उच्चधिकार अध्यक्ष सयाजी राहाणे,शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष सुनिल ढेरंगे,सरचिटणीस केशव घुगे,अंजली मुळे,भवनाचे अध्यक्ष विलास दिघे,दिनकर कोकणे, प्रकाश शिंदे, रामनाथ कार्ले, भरत काळे , जालिंदर बढे,राजू आव्हाड,एम.डी.फटांगरे, कैलास भागवत, जिजाभाऊ नेहे,प्रवीण वाकचौरे,संदिप पर्बत,आबा फटांगरे,गोरक्षनाथ भोकनळ,सुभाष औटी,सुनिल पवार,सुरेश शिरतार,भाऊ रंधे, लक्ष्मण भारती,विस्ताराधिकारी बबन निघुते,रामदास मोरे, केंद्रप्रमुख रोकडे साहेब, रोहीदास हासे,बी.के.जोशी आदींसह तालुक्यातील शिक्षक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
Post a Comment