स्टेट बँकेत अधिकारी होण्याची संधी...ऑनलाईन अर्ज भरणे सुरु


स्टेट बँकेत अधिकारी होण्याची संधी...ऑनलाईन अर्ज भरणे सुरुनवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडियाने, प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि योग्य उमेदवार यासाठी अधिकृत वेबसाईट sbi.co.in वर अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 डिसेंबर आहे. अ‍ॅप्लिकेशन प्रिंट करण्याची शेवटची तारीख 19 डिसेंबर 2020 आहे.

एसबीआय ऑनलाईन प्रिलिमिनरी परीक्षा 31 डिसेंबर, 2, 4 आणि 5 जानेवारी, 2021 रोजी आयोजित करणार आहे. तर याच्या रिझल्टची घोषणा जानेवारी 2021 च्या तिसऱ्या आठवड्यात होईल. प्राथमिक परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षा देता येणार आहे. या रिक्रूटमेंट ड्राईव्हद्वारे 2 हजार पदांसाठी भरती केली जाणार आहे. एकूण 2 हजार व्हॅकेन्सीपैकी 810 सामान्य पदं, 540 ओबीसी, 200 ईडब्ल्यूएस आणि 150 पदं एसटी कॅटेगरीसाठी असणार आहेत.


https://www.sbi.co.in/web/careers/current-openings

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post