मराठा विद्यार्थ्यांच्या ‘फी’चा भार सरकार उचलणार

 मराठा विद्यार्थ्यांच्या ‘फी’चा भार सरकार उचलणार 

वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांची मोठी घोषणामुंबई : वैद्यकीय शाखेतील प्रवेशात आरक्षणापासून वंचित राहणार्‍या मराठा विद्यार्थींच्या फी चा भार राज्य सरकार उचलणार आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाला स्थगिती असतानाही वैद्यकीय शाखेतील प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला अधीन राहून प्रवेश प्रक्रिया सुरू करणार असल्याची माहीती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे. 

वैद्यकीय शाखांचे शैक्षणिक वेळापत्रक पाळावे लागते. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया सुरू करावी लागेल. आरक्षणाचा लाभ न मिळाल्याने ज्यांचे नुकसान होणार आहे, त्यांचे नुकसान होऊ नये यासाठी पर्यायांवर चर्चा सुरू असल्याचे देशमुख म्हणाले. 

यापूर्वी जेव्हा असे झाले होते त्यावेळी अशा विद्यार्थ्यांची फी सरकारने भरली होती. आताही त्या पर्यायावर विचार सुरू असून मंत्रीमंडळापुढे वैद्यकीय शिक्षण विभाग त्याबाबत प्रस्ताव मांडणार आहे. मराठा आरक्षण स्थगिती आहे, त्यामुळे सगळी प्रवेश प्रक्रिया थांबवता येणं शक्य नाही. 


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post