रस्त्याच्याकडेला झोपलेल्या तिघांना टेम्पोने चिरडले, एकाचा दुर्देवी मृत्यु

 रस्त्याच्याकडेला झोपलेल्या तिघांना टेम्पोने चिरडले, एकाचा दुर्देवी मृत्युनगर : दिवाळीच्या मध्यरात्रीनंतर नगरमधील चांदणी चौकात भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या टेम्पोने चांदणी चौकात रस्त्याच्या कडेला झोपलेल्या तिघा बुट विक्रेत्यांना चिरडले. यात झोपेत असलेल्या मेहताब शेख या युवकाचा जागेवर मृत्यू झाला. दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर टेम्पो चालक पसार झाला. टेम्पोमधील एक जण जखमी असून त्याच्यावर देखील उपचार सुरू आहेत. चांदणी चौकात रस्त्यालगत अनेक छोटे-मोठे व्यावसायिक आहेत. उत्तरप्रदेशमधून आलेला शेख परिवार तिथेच बुट विक्रीचा व्यवसाय करत होते. सायंकाळी दुकान आवरल्यानंतर शेख परिवार रस्त्यालगतच छोटेखानी टपरीत झोपले होते. शनिवारी मध्यरात्री त्यांच्या टपरीला टेम्पोने चिरडले. कॅम्प पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post