नरेंद्र फिरोदिया यांच्या माध्यमातून ऐतिहासिक वस्तूसंग्रहालयातील ‘या’ ठेव्याला मिळाली नवसंजीवनी

 नरेंद्र फिरोदिया यांच्या माध्यमातून ऐतिहासिक वस्तूसंग्रहालयातील दुर्मिळ पुस्तकांना नवसंजीवनीनगर : नगरमधील उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांचा वाढदिवस दि.16 नोव्हेंबर रोजी साजरा झाला. यानिमित्त अनेकांनी फिरोदिया यांना शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक कार्याचा, समाजाप्रती असलेल्या बांधिलकीचा गौरव केला. फिरोदिया यांच्या माध्यमातून अहमदनगर ऐतिहासिक वस्तू संग्रहालयाचा होत असलेला कायापालट संग्रहालयाचे प्रा.डॉ.संतोष यादव यांनी अधोरेखित करीत फिरोदिया यांना शुभेच्छा दिल्या.

यादव यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, नरेंद्र शांतीकुमारजी फिरोदिया यांनी अहमदनगरची ओळख ठरणार्‍या ऐतिहासिक वस्तू संग्रहालय व संशोधन केंद्रास डिजिटल स्कॅनर भेट म्हणून दिले. त्यामुळे ऐतिहासिक आणि दुर्मिळ पुस्तकांना नवसंजीवनी मिळून त्यातील 10 हजारांवर पुस्तके स्कॅन करून पीडीएफ झाली. संग्रहालयास संगणक,  टेबल खुर्ची देऊन अनेक बंद असलेले विभाग नरेंद्र भाऊ यांच्या माध्यमातून सुरु झाले.  स्कॅन करणार्‍या मुलांचे पगार गेल्या तीन वर्षांपासून स्व. शांतीकुमारजी फाउंडेशन करत आहे.  अहमदनगर संग्रहालय जागतीक ओळख बनण्याच्या माध्यमातून नरेंद्र भाऊ यांनी संग्रहालयास सोलर सिस्टीम, डिजिटल टच स्क्रीन, ऑडिओ हेड फोन सिस्टिम नुकतीच मंजूर केली आहे. तेही काम प्रगती पथावर आहे. अहमदनगरच्या इतिहासावर पीएचडी करणार्‍या विद्यार्थ्यांना त्यांनी नुकतीच शांतीकुमारजी फेलोशिप मंजूर केली आहे.  एखादे पुस्तक असो किंवा सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा क्षेत्र, असो किंवा समाजकारण प्रत्येक गोष्टीत नरेंद्र फिरोदिया यांचा मदतीचा हात पुढे असतो. या अष्टपैलू व्यक्तीमत्वास वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा!0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post