अनलॉक अंतर्गत रायगड किल्ला पर्यटकांसाठी खुला

 


अनलॉक अंतर्गत रायगड किल्ला पर्यटकांसाठी खुला



अलिबाग : करोनाच्या लॉकडाऊनमुळे राज्यातील अनेक पर्यटनस्थळे बंद ठेवण्यात आली आहे. शिवप्रेमींसाठी नतमस्तक होण्याचे ठिकाण असलेला रायगड किल्लाही पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला होता. मात्र आता दिवाळीत रायगड किल्ला पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी यासंदर्भात आदेश काढले आहेत. रायगड जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळं खुली करण्यात आली आहे. दरम्यान, इथे येणार्‍यांना सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर बंधनकारक असणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रायगडमधील सर्व पर्यटन स्थळं बंद ठेवण्यात आली होती. अनलॉकच्या काळात रायगड पर्यटकांसाठी खुला करण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार रायगड खुला झाल्याने शिवप्रेमींमधून आनंद व्यक्त होत आहे.आता जिल्‍हाधिकारी यांच्‍या आदेशामुळे रायगड किल्‍ल्‍याबरोबरच चवदार तळे व इतर गडकिल्‍ले या ठिकाणी पर्यटनाचा आनंद घेता येणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post