पोलिस अधिकार्यांच्या जिल्हांतर्गत बदल्या


 पोलिस अधिकार्यांच्या जिल्हांतर्गत बदल्यानगर : जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या आज, बुधवारी बदल्या करण्यात आल्या. त्यामध्ये आठ पोलीस निरीक्षक, सात सहायक पोलीस निरीक्षक व एका महिला उपनिरीक्षकाचा समावेश आहे. कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून राकेश माणगावकर यांची तर शहर वाहतूक शाखेत अविनाश शिळीमकर यांची नियुक्ती झाली आहे.

बदलण्यात आलेले पोलीस निरीक्षक पुढीलप्रमाणे- प्रवीण लोखंडे कोतवालीहून शिर्डी, राकेश माणगावकर कोपरगावहून कोतवाली, अभय परमार संगमनेरहून नियंत्रण कक्षात, मुकुंद देशमुख राहुरीहून संगमनेर, हनुमंत गाडे साई मंदिरातून राहुरी, प्रभाकर पाटील जामखेडहून नियंत्रण कक्षात, अविनाश शिळीमकर नियंत्रण कक्षातून नगर शहर वाहतूक शाखा व सुहास चव्हाण नियंत्रण कक्षातून आर्थिक गुन्हे शाखा.

बदली झालेले सहायक पोलीस निरीक्षक पुढीलप्रमाणे- प्रकाश पाटील लोणीहून नगर शहर वाहतूक शाखा,समाधान पाटील श्रीरामपूरहून लोणी,सचिन बागुल राहुरीहून शनी शिंगणापूर, राजेंद्र सानप श्रीगोंदाहून स्थानिक गुन्हे शाखा, नव्याने जिल्ह्यात नियुक्त झालेले रामचंद्र करपे सोनई, सोमनाथ दिवटे कर्जतला, महेश जानकर जामखेडला व महिला पोलीस उपनिरीक्षक अश्विनी पाटील पोलीस अधीक्षकांच्या वाचक.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post