'ग्रामसेवा संदेश'मुळे ग्रामसेवक चळवळीला प्रेरणा : ना.बाळासाहेब थोरात

 'ग्रामसेवा संदेश'मुळे ग्रामसेवक चळवळीला प्रेरणा : ना.बाळासाहेब थोरात

ग्रामसेवा संदेश २०२० दिवाळी अंकाचे प्रकाशन नगर (सचिन कलमदाणे) : महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे  संपादित 'ग्रामसेवा संदेश' मासिक दीपावली विशेषांक सन 2020 या अंकाचे प्रकाशन महसूलमंत्री बाळासाहेब  थोरात  यांच्या संगमनेर येथे झालं.

      याप्रसंगी ना.थोरात म्हणाले की, ग्रामसेवक  चळवळ आणि ग्रामसेवा संदेश मासिक हे एकत्रितपणे कार्य करत असून चळवळीला पोषक असं लिखाण आणि वातावरण ग्रामीण विकासासाठी उपयुक्त असतं.या मासिकांमुळे ग्रामसेवक चळवळ भक्कम होण्यास मदत होत असल्याचे प्रतिपादन  थोरात  यांनी व्यक्त केले.  या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व कार्यक्रमाचे  स्वागत ग्रामसेवक पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र पावसे यांनी केले.

     याप्रसंगी नामदार थोरात यांचा संघटनेच्या वतीने सन्मान करण्यात आला. याप्रसंगी ग्रामसेवा संदेश मासिकाचे संपादक एकनाथ ढाकणे यांनी ग्रामसेवा संदेश मासिकाचे भूमिका कामकाज शासन निर्णय गुणगौरव या बाबीची माहिती देऊन नामदार थोरात  यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामसेवा संदेश मासिक अविरतपणे सतरा वर्षापासून कार्यरत असून ग्रामसेवकांच्या जडणघडणीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचे प्रतिपादन केले.  याप्रसंगी  बाबा खरात लोकसेवक तथा आदिवासी सेवक संगमनेर यांचाही गुणगौरव करण्यात आला. या प्रकाशन सोहळ्यासाठी कार्यकारी संपादक राजेंद्र फंड, जि.प.कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुनिल नागरे,रमेश बांगर,बाळासाहेब आंब्रे, गंगाधर राऊत, सुरेश मंडलिक, भारत देशमुख,  परसराम हासे , सिताराम निकम, सुभाष कुटे ,रामनाथ दादा मालुंजकर, अशोक बलसाने आदी उपस्थित होते. 
    

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post