‘त्यावेळी’ भाजप प्रवेशासाठी थेट पंतप्रधान कार्यालयातून फोन आला होता

 ‘त्यावेळी’ भाजप प्रवेशासाठी थेट पंतप्रधान कार्यालयातून फोन आला होता

शिवसेना नेते माजी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांचा गौप्यस्फोटमुंबई : भाजपची लाट असताना मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयातून फोन आला होता. गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी एकत्र चर्चा करायला लावली होती. पण मी भाजपमध्ये गेलो नाही असा गौप्यस्फोट माजी गृहराज्यमंत्री आणि शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी केला आहे. दीपक केसरकर नाराज असल्याच्या चर्चांनंतर केसरकरांनी स्पष्टीकरण दिलं.  मी शिवसेनेमध्ये का गेलो, तर ज्यावेळी मी नारायण राणेंविरुद्ध लढलो आणि माझी ताकद दाखवली, तेव्हा सगळ्या मोठमोठ्या पक्षांच्या मला ऑफर होत्या. त्यावेळी उद्धव ठाकरे मला म्हणाले होते, कुठल्याही पक्षात जा, तुला निवडून आणण्याची जबाबदारी माझी. असं कोणीच करत नाही. ज्यांनी पदं दिलं, त्यांच्याशी तरी प्रामाणिक राहायला हवं अशा भावना दीपक केसरकर यांनी व्यक्त केल्या. मंत्रिपदाबाबत मी नाराज नाही, तो पक्षप्रमुखांचा अधिकार आहे. सिंधुदुर्गाचं मंत्रिपद गेल्याचं शंभर टक्के दुःख आहे. वैभव नाईकांना मंत्रिपद दिलं असतं. मी त्यावेळी सांगितलं होतं, की मला मंत्रिपद दिल्यास तीन वर्षात चांदा ते बांदा विकास करुन मी राजीनामा दिला असता आणि वैभव नाईक यांना मंत्रिपद देण्याची विनंती उद्धव ठाकरेंना केली असती. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपद मिळाल्याचं समाधान आहे. असेही केसरकर म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post