भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्यावर 'या'मोठ्या राज्याची जबाबदारी

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्यावर 'या'मोठ्या राज्याची जबाबदारी

पक्षाकडून राज्यांचे प्रभारी, सहप्रभारी नियुक्त, विनोद तावडे पाहणार 'या' राज्याचे संघटन
नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाने  36 राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांसाठी पक्षाचे प्रभारी आणि सह प्रभारींची यादी जाहीर केली आहे. यानुसार महाराष्ट्रातील अनेक नेत्यांकडे मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यामध्ये विनोद तावडे यांची हरियाणा प्रदेश भाजप प्रभारीपदी नियुक्ती, सुनील देवधर यांची आंध्रप्रदेश सह प्रभारी पदी, पंकजा मुंडे यांची मध्य प्रदेश सह प्रभारी पदी आणि विजया रहाटकर यांची दमन दीव - दादरा - नगर हवेली प्रभारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.


 महाराष्ट्राचे प्रभारी सी.टी. रवी असतील. रवी यांच्याकडे महाराष्ट्रासह गोवा आणि तामिळनाडूचीही जबाबदारी देण्यात आली आहे.  उत्तर प्रदेशच्या प्रभारी पदी राधा मोहन सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर पश्चिम बंगालची जबाबदारी कैलास वर्गिय यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post