राज्यात लवकरच भाजपची सत्ता : राधाकृष्ण विखे-पाटील

 

राज्यात लवकरच भाजपची सत्ता : राधाकृष्ण विखे-पाटीलशिर्डी: पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या  नेतृत्वाखाली सबका साथ सबका विकास मंत्राने संपूर्ण देशाचा विश्वास संपादन केला आहे.बिहार निवडणुकीच्या यशानंतर सर्वाची  जबाबदारी वाढली आहे.आगामी निवडणुका लक्षात घेवून आत्मनिर्भर योजना समाजाच्या शेवटच्या घटकापर्यत पोहचवा. राज्यात  लवकरच सता येईल.  शिर्डी नगरपंचायतीवरही भाजपचाच  झेंडा फडकविण्यासाठी कटीबध्द व्हा असा संदेश भाजपाचे जेष्ठ नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला.


 शिर्डी शहरातील भाजपच्या नूतन पदाधिकाऱ्यांना नियक्ती पत्र आ.विखे पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, शहर अध्यक्ष ज्ञज्ञानेश्वर गोंदकर,पक्षाच्या उद्योग आघाडीच्या उतर महाराष्ट्राचे प्रमुख शिवाजीराव गोंदकर शहराचे अध्यक्ष सचिन शिंदे उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन आदी याप्रसंगी उपस्थित होते.


आपल्या भाषणात आ.विखे पाटील म्हणाले की,बिहार विधानसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेले यश हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करणारे आहे.इतर राज्यात झालेल्या पोटनिवडणुकीतून  जनतेचे पाठबळ भाजपाच्या पाठीशी असल्याचे सिध्द झाले आहे.जगातील  सर्वात मोठ्या पक्षाचे आपण पदाधिकारी आणि कार्यकर्ते असल्याने  प्रत्येकाची जबाबदारी वाढली आहे.


      करोना संकटाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या  नेतृत्वाकडे  जगाचे लक्ष वेधले गेले,केलेल्या यशस्वी उपाय योजनांमुळे भारतात मृत्यूचा दर कमी राहीला.देशवासीयांना दिलासा देण्यासाठी आत्मनिर्भर  योजनेच्या माध्यमातून पथविक्रेते आणि उद्योजकांपर्यत सर्वानाच  उभारी देण्याचे काम केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू असल्याकडे लक्ष वेधून आ.विखे म्हणाले की केंद्र सरकारच्या योजना शेवटच्या माणसापर्यत पोहचविण्यासाठी  कार्यकर्त्यांची जबाबदारी वाढली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


    राज्यातील महाविकास आघाडी सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे.अनेक महीने घरात बसलेले मुख्यमंत्री राज्याने कधी पाहीले नव्हते.शेतकरी मदतीपासून वंचित आहेत.समाजातील कोणत्याच घटकांना आघाडी सरकार दिलासा देवू शकले नाही.महाविकास आघाडी सरकारचे अपयश जनतेला सांगावे लागेल.आगामी काळात नगरपंचायतीची असलेली  निवडणुक लक्षात घेवून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नियोजन सुरू करावे थोड्याच दिवसात राज्यात सता येईल  आणि नगरपंचायतीवरही भाजपा झेंडा फडकेल असे सुतोवाचही आ.विखे यांनी केले.
0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post