भाजप 'इलेक्शन' मोडमध्ये, निवडणूक प्रभारींच्या नियुक्त्या
कर्डीले, पाचपुते, मुरकुटे, आगरकर यांच्यावर मोठी जबाबदारी
नगर : नगर जिल्ह्यात आगामी काळात होणार्या नगर परिषद, नगर पंचायत निवडणुकीसाठी भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पुढील वर्षी पारनेर, कर्जत येथे नगरपंचायत तर जामखेड, शेवगाव मध्ये नगरपरिषद निवडणूक होणार आहेत. यासाठी भाजप जिल्हाध्यक्ष अरूण मुंढे यांनी निवडणूक प्रभारींच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. पारनेर :माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले, शेवगाव :-माजी मंत्री बबनराव पाचपुते, कर्जत :-माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे तर जामखेडसाठी माजी नगराध्यक्ष अभय आगरकर यांच्या वर जबाबदारी देण्यात आली आहे.
सर्व निवडणुका नगर दक्षिणेत होणार आहे. यासाठी भाजपने आजी माजी आमदार नियुक्त केले असले तरी दक्षिणेत तीन वेळा खासदार असलेल्या दिलीप गांधी यांना मात्र संघटनेने जबाबदारी सोपवली नाही. याचीही चर्चा पक्ष वर्तुळात होत आहे.
Post a Comment