बॉलीवूडला धक्का...‘या’ प्रसिध्द अभिनेत्याची आत्महत्या

 अभिनेता आसिफ बसरा यांनी आत्महत्या केलीनवी दिल्ली: बॉलिवूड अभिनेता आसिफ बसरा यांनी आत्महत्या केली आहे. गुरुवारी कांगडा जिल्ह्यातील धर्मशाळा मधील मॅक्डोलगंजच्या जोगिबाडा रोडवर असणाऱ्या एका कॅफेजवळ त्यांनी आत्महत्या केली आहे. त्यांच्या  आत्महत्येचं ठोस कारण अद्याप समजलं नाही आहे. कांगडाचे एसपी विमुक्त रंजन यांनी या  घटनेला दुजोरा दिला आहे. वयाच्या 53 व्या वर्षी अशाप्रकारे टोकाचे पाऊल उचलल्याने संपूर्ण बॉलिवूड हादरले आहे.

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून याप्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे. अशी माहिती मिळते आहे की, आसिफ बसरा गेल्या 5 वर्षांपासून मॅक्डोलगंज मध्ये भाड्याच्या घरात राहत होते, त्यांच्याबरोबर त्यांची एक विदेशी मैत्रिण देखील राहत असे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post