नगरमधील 'या' सहकारी बँकेत लक्ष्मीपूजन उत्साहात

 अहमदनगर शहर सहकारी बँकेत लक्ष्मी पुजन संपन्ननगर : सहकारी बँकींग क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या अहमदनगर शहर सहकार बँकेमध्ये विधिवत लक्ष्मी पुजन संपन्न झाले. यावेळी संचालक  अशोक कानडे, सीए गिरीष घैसास, उपाध्यक्ष सुजित बेडेकर, सीए सुनिल फळे, सीईओ तन्वीर खान, जॉईंट सीईओ डी. वाय. कुलकर्णी, विशेष कार्यकारी अधिकारी जवाहर कटारिया, कर्मचारी प्रतिनीधी संजय मुळे आदींसह कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी जेष्ठ संचालक  अशोक कानडे म्हणाले की, व्यापार उद्योगामध्ये लक्ष्मी पुजनास विशेष महत्व असते. बँकेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी व भरभराटीसाठी लक्ष्मी मातेचे मनोभावे पुजन आजच्या शुभ मुहुर्तावर करण्यात आले.
यावेळी कर्मचाऱ्यांना मिठाई व भेटवस्तू देऊन बँकेच्या सभासद व ग्राहकांना शुभेच्छा देण्यात आल्या.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post