अभिनेत्री प्रियंका चोप्रा बनली फॅशन दूत
मुंबई : भारतीय अभिनेत्री प्रियांका चोप्राने आणखी एक नवी जबाबदारी आता आपल्या शिरावर घेतली आहे. अर्थात तिचा फॅशन सेन्स आणि तिची लोकप्रियता लक्षात घेऊन तिला ती जबाबदारी देण्यात आली आहे. प्रियांका चोप्रा-जोनास आता ब्रिटिश फॅशन कॉन्सिलची दूत म्हणजे अॅम्बेसिडर बनली आहे. पुढच्या वर्षभरासाठी ती त्या फॅशन कॉन्सिलसाठी काम करणार आहे. प्रियांकानेच ट्विटरवर ही माहिती दिली. तिने निकसोबत लग्न केल्यानंतर अमेरिकेत सेटल झाली आहे. तिथे ती सातत्याने सोशल वर्क करत असते. अनेक मोठ्या आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टमध्ये ती काम करते आहे. तिच्या कामाची दखल घेऊनच ब्रिटिश फॅशन कॉन्सिलने तिला आपली दूत म्हणून नेमलं आहे.
Post a Comment