शेतीमालाला आधारभूत किंमत न दिल्यास व्यापार्‍यावर खटला

 शेतीमालाला आधारभूत किंमत न दिल्यास व्यापार्‍यावर खटला

राज्यात नवीन कायदा करण्याचे महसूलमंत्री थोरात यांचे संकेतमुंबई: केंद्र सरकारने तयार केलेल्या कृषी कायद्यांना विरोध करीत महसूल मंत्री आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नवा कायदा तयार करण्याचे संकेत दिले आहेत. शेतकर्‍यांना मदत करण्यासाठी मंत्र्यांची समिती गठीत केली जाणार आहे. तसेच व्यापार्‍यांनी शेतकर्‍यांना आधारभूत किंमत दिली नाही तर त्यांच्यावर खटला दाखल करण्याची तरतूद करत करण्यात येणार आहे, असं बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं. बाळासाहेब थोरात यांनी प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना ही माहिती दिली. केंद्राने पास केलेला कृषी कायदा शेतकरी विरोधी आहे. त्याला विरोध म्हणून 2 कोटी शेतकर्‍यांच्या सह्यांचं निवेदन कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना देण्यात येणार आहे. सोनिया गांधी हे निवेदन राष्ट्रपतींना देणार आहेत. या 2 कोटी सह्यांपैकी एकट्या महाराष्ट्रातूनच 60 लाख सह्या झाल्या आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post