एक लाखांची लाच घेताना पोलिस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

 

एक लाखांची लाच घेताना पोलिस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यातनगर: संगमनेर शहर पोलिस ठाण्यात दाखल चोरीच्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी तक्रारदाराकडे २ लाखांची लाच मागून त्यातील १ लाख रुपयांची रक्कम स्विकारताना पोलिस उपनिरीक्षक राणा प्रतापसिंग परदेशी (वय 32 पोलीस उपनिरीक्षक नेम. संगमनेर शहर पोलीस स्टेशन) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. विशाल रवींद्र पावशे (वय 31  धंदा व्यापार रा साई श्रद्धा चौक संगमनेर (खाजगी इसम)) याच्यामार्फत परदेशी याने लाच स्विकारली.                                                          नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक विजय जाधव, पोलिस निरीक्षक संदीप साळुंखे, पो.ना.प्रकाश डोंगरे,  वैभव देशमुख, प्रणय इंगळे, संतोष गांगुर्डे यांच्या पथकाने ही कारवाई केली.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post