शहीद जवान भूषण सतई अनंतात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

 

शहीद जवान भूषण सतई अनंतात विलीन

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; नागपूर, दि.१६:  जम्मू काश्मीरमध्ये शहीद झालेले काटोलचे सुपुत्र शहीद नायक भूषण सतई यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात मंत्रोपचाराने अंत्यविधी  पार पडला. यावेळी साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला. शहीद वीरपुत्राचे वडील रमेश सतई यांनी भडाग्नी दिला.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुष्पचक्र अपर्ण करुन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली, तसेच कुटुंबियाचे सांत्वन केले, संपूर्ण शासकिय इतमामात अंत्यसंस्काराचा विधी पार पडला. शहीद भूषण सतई यांना ब्रिगेड ऑफ गार्ड रेजिमेंटच्या गरुडा परेड ग्राऊंडवरुन काटोल येथे आणण्यात आले. अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव घरी ठेवण्यात आले. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांचे वडील रमेश सतई, आई मीराबाई सतई तसेच आप्तजनांचे सांत्वन केले.


शहीद भूषण सतई हे मुळचे काटोलचे असून खोऱ्यातील गुरेज सेक्टरमध्ये मागील शुक्रवारी पाकिस्तानने केलेल्या हल्यात भारतीय लष्काराचे चार जवान शहीद झाले होते. यामध्ये काटोल येथील भूषण रमेश सतई यांना वीरमरण आले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post