राहुल व्दिवेदी यांना आणखी एका पदाचा अतिरिक्त कार्यभार


 राहुल व्दिवेदी यांच्याकडे  राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद संचालक पदाचाही कारभार मुंबई:  नगरचे जिल्हाधिकारी राहिलेले राहुल व्दिवेदी यांची मुंबईत बदली झाल्यावर आता त्यांच्या कडे आणखी एका पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. समग्र शिक्षाचे राज्य प्रकल्प संचालक असलेल्या द्वीवेदी यांच्या कडे आता संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. यावेळी परिषदेतील अधिकाऱ्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ व पुस्तके देऊन स्वागत केले. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post