ग्रामसेवक युनियनचे राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे यांच्या गाडीला कंटेनरची धडक

 ग्रामसेवक युनियनचे राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे यांच्या गाडीला कंटेनरची धडक.... ढाकणे व गाडीतील सगळे बालंबाल बचावले.नगर : महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे यांच्या गाडीला आज सायंकाळी नगरमध्ये अपघात झाला. नगर कल्याण रोडवर ढाकणे यांच्या गाडीला भरधाव वेगाने धावणाऱ्या मोठ्या कंटेनरने धडक दिली. सुदैवाने दैव बलवत्तर असल्याने गाडीतील कोणाला इजा झाली नाही. कंटेनर चालकाने पूढे एसटी बससह अनेक वाहनांना धडक दिली. एकनाथ ढाकणे यांच्या समवेत चालक तसेच जि.प.कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष सुनील नागरे, ग्रामसेवक पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र पावसे गाडीत होते. अपघाताची माहिती देताना एकनाथ ढाकणे यांनी सांगितले की, काळ आला होता पण वेळ आली नव्हती याची प्रचिती आज आली. बेफाम गाडी चालवताना कंटेनर चालकाने आमच्या गाडीला धडक दिली. सुदैवाने आम्ही सुखरुप असून कोणालाही इजा झाली नाही. राज्यातील ग्रामसेवकांच्या शुभेच्छा पाठीशी असल्याने मोठ्या संकटातून बालंबाल बचावलो. मी सुखरुप असून ग्रामसेवकांनी काळजी करू नये असे आवाहन ढाकणे यांनी केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post