सरकारी कर्मचारी व शिक्षकांची 26 नोव्हेंबरला देशव्यापी संपाची हाक

 सरकारी कर्मचारी व शिक्षकांची 26 नोव्हेंबरला देशव्यापी संपाची हाक

टाळेबंदी काळात कामगार विरोधी घेतलेले निर्णय, खाजगीकरण व कंत्राटीकरणाने कर्मचारी, कामगार व शिक्षकांमध्ये अस्वस्थताअहमदनगर (प्रतिनिधी)- टाळेबंदी काळात कामगार विरोधी घेतलेले निर्णय, खाजगीकरण व कंत्राटीकरणाने राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षकांच्या आर्थिक सेवा व हक्क विषयक अस्वस्थता निर्माण झाली असल्याने या हक्काचे व अधिकार अबाधित ठेऊन विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाने केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 26 नोव्हेंबर रोजी एक दिवसीय देशव्यापी संपाची हाक दिली आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र, अहमदनगर जिल्हा शाखेच्या वतीने संपाची नोटीस अप्पर जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे यांना देण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर, सरचिटणीस रावसाहेब निमसे, विजय काकडे, विलास पेद्राम, बाळासाहेब वैद्य, भाऊसाहेब डमाळे, कैलास साळुंके, पुरुषोत्तम आडेप, शिक्षक समन्वय समितीचे राजेंद्र लांडे, भाऊसाहेब थोटे आदी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post