आतापर्यंत 115 शिक्षक आढळले करोनाबाधित...

 आतापर्यंत 115 शिक्षक आढळले करोनाबाधित...



मुंबई : 23 नोव्हेंबरपासून राज्यात इयत्ता नववी ते बारावी शाळा सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून शिक्षकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. यात राज्यातील तब्बल 115 शिक्षकांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. शाळा सुरु होण्यापूर्वी इतके शिक्षक कोरोनाबाधित आढळल्याने आता विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.  उस्मानाबाद जिल्ह्यात 48 शिक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे. यात उस्मानाबाद शहरातील श्रीपतराव भोसले हायस्कूलच्या 20 शिक्षकांचा समावेश आहे. बीड जिल्ह्यातील 6500 हजार शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली. यात पहिल्या एक हजार चाचणीत 25 शिक्षक कोरोनाबाधित आढळल्याने प्रशासन आणि पालकांची चिंता वाढली आहे

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post