सरकारला काम करता येत नसेल तर बाजूला व्हावे राज्याचे प्रश्न सोडवू : खा. सुजय विखे पाटील
नगर : राज्याचे सरकार हे तीन पक्ष एकत्र येऊन षडयंत्र रचून स्थापन झालेले सरकार आहे. या सरकारला काम करता येत नसेल तर बाजूला व्हावे. आम्ही या
राज्याचे प्रश्न सोडवू. आजही जिल्ह्यामध्ये भाजपचे आमदार असताना मंजूर केलेल्या विकास कामांचे उद्घाटने हे लोक करीत आहेत. नगर जिल्ह्याध्ये कोरोनाची
परिस्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकारने ६0 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला होता. या सरकारने काय दिले हे आधी सांगावे. हे सरकार फक्त केंद्राकडून
जीएसटीचे पैसे मागत आहेत. आम्ही जीएसटीचे पैसे आणून देण्यासाठी मदत करतो. ते पैसे शेतकऱ्यांना देणार का, असा प्रश्न उपस्थित केला. राज्याचे मुख्यमंत्री सत्तेवर
नसताना वेगवेगळे प्रश्न उपस्थित करायचे. आता सत्तेवर असताना वेगवेगळ्या घोषणा करुन त्यांना आता शेतकऱ्यांचा विसर पडला आहे का?, माजी मंत्री शिवाजीराव
कर्डिले यांची विकासकामे खूप चांगले आहेत. ते या वयामध्ये काम करत आहेत. ते आम्हाला लाजवेल असे विकासकामे करत आहेत. साकळाई योजनेसाठी माजी मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी काम सुरु करण्यासाठी अडीच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. आता या योजनेच्या कामासाठी सरकारने पुढील कारवाई करावी,
अन्यथा माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली जनआंदोलन उभे करू, असे प्रतिपादन खा. सुजय विखे यांनी केले.
जिल्हा बॅकेच्यावतीने शेतकऱ्यांसाठी खेळते भाडंवल म्हणून वाळकी, वडगाव तांदळी येथे सुमारे ११ कोटी रुपयांचा धनादेश वाटप करताना खा. सुजय विखे,
आ. बबनराव पाचपुते, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे, उपसभापती संतोष म्हस्के, सुरेश सुंबे, सरपंच स्वाती बोठे, दिलीप
भालसिंग, भाऊसाहेब बोठे, शरद बोठे, संतोष भापकर आदी उपस्थित होते.
सुजय विखे पुढे म्हणाले की, विकास कामांमध्ये टक्केवारी घेण्याचा सपाटा सुरु आहे. परंतु आम्ही कधीही टक्केवारी घेतली नाही आणि ती आमच्या रक्तातही
नाही. पक्षापेक्षा काम करणाऱ्या माणसाकडे पहायला शिका आणि मतदान करा. जिल्ह्यातील व नगर तालुक्यातील पुढाऱ्यांनी भाषणांची मर्यादा पाळली पाहिजे. विकास
कामांतील संघर्ष हा वैचारिक असला पाहिजे. माजी मंत्री कर्डिले यांनी संकटाच्या काळामध्ये जे काम शेतकऱ्यांसाठी बॅकेच्या माध्यमातून करत आहे, ते कौतुकास्पद आहे.
आज मी भाजपचा खासदार आहे. आपले हेलिकॉप्टर तेव्हाही होते व भविष्यातही राहणार, त्यावेळी खासदारकीचे तिकीट हेलिकॉप्टरमुळे कापले गेले होते. त्यावेळी मी
काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीमध्ये होतो. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मला विचारले होते की, तू आत्ताच हेलिकॉप्टरमध्ये फिरतोस, निवडून कसा येणार, पुढे काय झाले हे
सर्वांनाच माहित आहे. पण आता बरे झाले त्यांचे तिकीट मिळाले नाही. आज मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पक्षाचा खासदार आहे आणि मी आनंदी आहे.
यावेळी बोलताना आ. पाचपुते म्हणाले की, जिल्हा बॅकही कारखानदारांची होती. ती आता माजीमंत्री कर्डिले यांनी शेतकऱ्यांच्या दारापर्यंत नेली. केंद्र
सरकारच्या शेतकऱ्यांसाठी मोठ्या योजना आहेत. याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा. मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते की, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा. सरसकट कर्जमाफी
करा या घोषणेचा विसर आता मुख्यमंत्र्यांना पडला आहे का? आमदारकीच्या काळामध्ये सर्वात जास्त सहकार्य करण्याचे काम खा. सुजय विखे यांनी केले. असे ते म्हणाले.
यावेळी कर्डिले बोलताना म्हणाले की, नगर जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील पिके वाया गेली. या ठिकाणी जिल्हा बॅक शेतकऱ्यांसाठी धावून आली.
आता बँकेमध्ये जे निर्णय होत नव्हते, ते आता शेतकऱ्यांसाठी होऊ लागले. नगर जिल्ह्यामध्ये महामार्ग व अंतर्गत रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. त्यामुळे अपघात
मोठ्या प्रमाणात होत आहेत. या सरकारने नगर जिल्ह्यातील रस्त्यांसाठी मोठा निधी उपलब्ध करून द्यावा, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू. खा. सुजय विखे यांनी नगर-
मनमाड रस्त्यासाठी मोठा निधी आणला तसाच नगर सोलापूर रस्त्यासाठी आणावा व जिल्ह्यातील रस्त्यांची झालेली बिकट अवस्था सुधरावी, अशी मागणी यावेळी केली.
Post a Comment