नाकर्त्या सरकारचा बचाव करणं एवढंच शरद पवारांचे काम

 नाकर्त्या सरकारचा बचाव करणं एवढंच शरद पवारांचे काम 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची टिकापुणे : राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची दौरे न करण्यावरून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पाठराखण केली. तुळजापुरात पत्रकारांशी बोलताना पवारांनी मुख्यमंत्री मुंबई राहून निर्णय प्रक्रिया राबवतात व आम्ही बाहेर फिरतो असे म्हटले होते. पवारांच्या या वक्तव्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्र सरकारचा नाकर्तेपणा समोर आला असून सरकारचा नाकर्तेपणा लपवण्यासाठी सरकारचा बचाव करण्याचं एकमेव काम शरद पवार यांना उरलं आहे, अशी टीका त्यांनी केली आहे. महाराष्ट्रातील शेतकर्‍याला टोलवाटोलवी नको आहे. राज्य सरकार काय करणार आहे हे स्पष्टपणे सांगावे अशी महाराष्ट्रातील शेतकर्‍यांची मागणी असल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. राज्यपालांचे एखादे वाक्य आणि त्यावरील विवाद यावर वाद करत बसण्याची ही वेळ नसल्याचेही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post