वन्यजीव छायाचित्र स्पर्धेत नगरचे नितीन केदारी यांना प्रथम पुरस्कार

 वन्यजीव छायाचित्र स्पर्धेत नगरचे नितीन केदारी यांना प्रथम पुरस्कारनगर - वनविभाग जुन्नर व जुन्नर पर्यटन विकास संस्था यांचे तर्फे वन्यजीव सप्ताह निमित्त आयोजित छायाचित्र स्पर्धेत छायाचित्रकार श्री.नितीन केदारी यांना प्रथम पुरस्कार प्राप्त झाला.त्यांनी काढलेल्या ‘पंखेवाला सरडा’ या छायाचित्रास हा पुरस्कार उपवनसंरक्षक श्री.जयरामे गौडा आर यांच्या हस्ते देण्यात आला.यावेळी पर्यटन विकास संस्था अध्यक्ष श्री.यश मस्करे ,राधाकृष्ण गायकवाड,श्रीरीष भोर,रविंद्र काजळे ,धीरज चवरे,मनोज हाडवळे उपस्थित होते.

वन्यजीव सप्ताह निमित्त आयोजित छायाचित्र स्पर्धेत पुणे ,नगर ,नाशिक सह  ३५६ छायाचित्रकार सहभागी झाले होते.पंखेवाला सरडा  नगरच्या जवळपास अनेक ठिकाणी आढळतात, त्यांचे छायाचित्र टिपणे अतिशय अवघड असून अनेक दिवस निरीक्षण करून ,त्यांच्या हलचालीवर लक्ष  ठेवावे लागते .वेळ ,निरीक्षण  व सराव या तीन गोष्टींचा मेळ  साधला तर सुंदर छायाचित्र टिपता येते असे मत पुरस्कार प्राप्त श्री.केदारी यांनी व्यक्त केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post