‘ते’ उर्जा मंत्री असले तरी वीजेचे प्रश्न घेवून शेतकरी माझ्याकडेच येतात

 ‘ते’ उर्जा मंत्री असले तरी वीजेचे प्रश्न घेवून शेतकरी माझ्याकडेच येतात

माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांचा राज्यमंत्री तनपुरे यांना टोला



नगर : राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये मी 10 वर्षे आमदारकीचे प्रतिनिधीत्व केल्यामुळे मतदारसंघातील नागरिकांचा विकास कामातून विश्वास निर्माण केला. त्यामुळे आजही मतदारसंघातील नागरिक विविध प्रश्न घेऊन माझ्याकडे येत असतात. माझ्या विरोधात निवडून आलेले उमेदवाराला ऊर्जा खात्याचे राज्यमंत्रीपद मिळाले असले तरी शेतकरी विजेचे प्रश्न सोडवण्यासाठी माझ्याकडे येत आहे. त्यांचे मंत्रीपद हे फक्त नावालाच आहे. मी आमदार नसलो तरी

शेतकर्‍याचे प्रश्न मी सोडवत असल्यामुळे शेतकरी तसेच सर्व सामन्य नागरिक माझ्याकडे येत आहे, असा टोला माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना लगावला आहे. 

नगर तालुक्यातील कापूरवाडी, बारा बाभळी, सोनेवाडी व मेहेकरी येथील शेतकर्‍यांना जिल्हा बॅकेच्या माध्यमातून खेळते भांडवलाचे चेक वाटप करताना माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखेडे, रघुनाथ लोंढे, अभिलाष धिगे, संतोष म्हस्के, मनोज कोतकर, रावसाहेब साठे, बाबासाहेब जाधव, दिपक लांडगे, सुरेश सुंबे, शरद दळवी, दिलीप भालसिंग, प्रंशात गहिले, विलास शिंदे, कानिफनाथ कासार, राजू

भिंगारदिवे, रंगनाथ कर्डिले, दत्ता तापकिरे, रवी कर्डिले, मच्छिंद्र दुसुंगे, जगन्नाथ कराळे, शंकर पवार, मिनीनाथ दुसुंगे, संभाजी भगत, मारुती कचरे, बापूसाहेब शिंदे, बाबासाहेब खर्से, अंबादास बेरड, गुलाबराव लांडगे, पाहुल पानसरे, राम पानमळकर, संजय धोतरे, संतोष पालवे, विजय खोमणे, माणिक वाघस्कर, मज्जूभाऊ शेख, अय्युब पठाण, अजय गारदे, किरण दळवी आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना सुरेश सुंबे म्हणाले की, संकटाच्या काळामध्ये शेतकर्‍यांना योग्यवेळी बॅकेच्या माध्यमातून मदत घेऊन येण्याचे काम माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केले. अतिवृष्टीमुळे शेतकरी मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यातच कोरोनाचे संकट आल्याने शेतकरी अडचणीत सापडला. अशा वेळेस आर्थिक मदतीचा गरज शेतकर्‍यांना होती. ती गरज माजी मंत्री कर्डिले यांनी पूर्ण केली. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post