भाजप नेते आशिष शेलारांनी केलं ठाकरेंचे तोंड भरून कौतुक

 भाजप नेते आशिष शेलारांनी केलं ठाकरेंचे तोंड भरून कौतुकमुंबईः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र तेजस ठाकरे यांच काम महाराष्ट्राची मान उंचावणारे असून हे महान कार्य आहे, असे कौतुक भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केलं आहे.  तेजस ठाकरे यांनी आंबोली घाटातील हिरण्यकेशी नदीत सोनेरी रंगाचे केस असलेल्या माशाची चौथी प्रजाती शोधून काढली आहे. या माशाचे नावही हिरण्यकेशी ठेवण्यात आलं आहे. तेजस ठाकरे यांच्या या नव्या शोधाचे भाजप नेते आशिष शेलार यांनीही कौतुक केलं आहे. सामना वृत्तपत्रातील बातमी शेअर करत शेलार यांनी ठाकरेंसाठी ट्विट केलं आहे. ’जीवसृष्टीला निसर्गानं अफाट वैविध्य आणि जगण्याचे विलक्षण रंग दिले. त्या अज्ञात अविष्कारांचे रंग तेजस उद्धव ठाकरे हे जगासमोर आणत आहेत. त्यांनी सोनेरी केसाच्या माशाची चौथी हिरण्यकेशी प्रजाती शोधली, त्यांचे हे काम महाराष्ट्राची मान उंचावणारे असून हे महान कार्य आहे,’ असं ट्विट शेलारांनी केलं आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post