कोव्हीड -१९या गंभीर आजाराचा वैद्यकीय परिपूर्ती सूचीत समावेश करणार, आरोग्यमंत्री टोपे यांची ग्वाही

 कोव्हीड -१९या गंभीर आजाराचा  वैद्यकीय परिपूर्ती सूचीत समावेश करणार, आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांची ग्वाही


अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाची आग्रही मागणी

शिक्षकांना कॅशलेस आरोग्य योजनेचा लाभ देण्याविषयी शासन सकारात्मक

अहमदनगर:अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या राज्य  शिष्टमंडळाने रविवार १८ ऑक्टोबर२०२० रोजी जिल्हा जालना येथे संघाचे राज्याध्यक्ष देविदास बस्वदे यांच्या नेतृत्वाखाली  आरोग्य मंत्री मा .राजेश टोपे यांची भेट घेवून कोव्हीड -१९या गंभीर आजाराचा वैद्यकीय सूचीत  समावेश करणे तसेच शिक्षकांना कॅशलेस आरोग्य योजनेचा लाभ देण्याविषयी आग्रही मागणी केली.

सरकारी कर्मचारी यांच्यासाठी कोव्हीड -१९ चा समावेश वैद्यकीय परिपूर्ती सुचीत करुन वैद्यकीय बाबीसाठी झालेला खर्च पूर्वलक्षी प्रभावाने (८मार्च २०२०) पासून लागू करण्याबाबत तात्काळ शासन निर्णय    निर्गमित  करण्यात येईल अशी स्पष्ट ग्वाही आरोग्यमंत्री यांनी संघाच्या शिष्टमंडळाला दिली असल्याची माहिती अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य सरचिटणीस कल्याण लवांडे व राज्यसंघटक राजेंद्र निमसे यांनी दिली

 शिक्षकांना कॅशलेस आरोग्य योजनेचा लाभ देण्याविषयी शासन सकारात्मक असून त्याबाबत निश्चित नजिकच्या काळात निर्णय घेण्याबाबत मंत्रीमहोदयांनी सांगितले.

 या शिष्टमंडळात राज्याध्यक्ष देविदास बस्वदे,राज्यसरचिटणीस कल्याण लवांडे, राज्य उपाध्यक्ष रवींद्रकुमार सोनवणे, राज्यसंयुक्त चिटणीस डॉ.रवींद्र काकडे , अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी ढाकणे, जिल्हा संघटक महेश लोखंडे, पाथर्डी तालुकाध्यक्ष भारत शिरसाठ, तालुक सरचिटणीस राजेंद्र खंडागळे आदिचा समावेश होता.

  या मागणीचे स्वागत अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य सरचिटणीस कल्याण लवांडे,राज्यसंघटक राजेंद्र निमसे यांचे सह राज्य उपाध्यक्ष सुनील जाधव, जिल्हा नेते सर्जेराव राऊत,जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कदम ,जिल्हा सरचिटणीस सुनिल शिंदे, ऐक्य मंडळाचे जिल्हाध्यक्ष रामप्रसाद आव्हाड, शरद वांढेकर, सुरेश नवले, रामराव ढाकणे, राजकुमार शहाणे, उत्तम शेलार, माधव गोडे, संजय शेळके, विष्णू चौधरी, दत्तात्रय परहर, विष्णू बांगर, प्रदीप चक्रनारायण, संदीप भालेराव, रज्जाक सय्यद ,संजय सोनवणे, शिवाजी ढाकणे, बापूराव वावगे, महेश लोखंडे, पावलस गोरडे, सुधीर रणदिवे, मधुकर डहाळे, सुनिल चुंभळकर, अश्पाक शेख, बाबासाहेब डोंगरे, सुधीर शेळके,लहू फलके , रविंद्र दरेकर ,सुखदेव डेंगळे , संजय मोटकर ,संभाजी तुपेरे, विलास लवांडे, दिलीप दहिफळे, मुकुंद सोनवणे,रवींद्र अनाप, शिवाजी नरवडे,सुधीर बोर्‍हाडे, जनार्दन काळे, बाळासाहेब जाधव,ज्ञानदेव कराड, लक्ष्मण चेमटे, संतोष ठाणगे, पांडुरंग देवकर, भारत शिरसाठ, अनिल शिरसाठ, राजेंद्र खंडागळे, सचिन शेरकर, प्रविण शेळके, बथूवेल हिवाळे, शहाजी जरे, संदीप कडू,दत्तात्रय काळे, दत्तात्रय बर्गे, शिवाजी माने, शहाजी शेळके, मधुकर टकले, ज्ञानदेव उगले,आदिल शेख, प्रमोद घोडके, संदीप गायकवाड, राहुल व्यवहारे, संजय कांबळे, दत्तात्रय दावभट,विशाल कुलट, विनायक गोरे, आदिनाथ पोटे, रविंद्र चंदन , मनोहर भालेराव,दिपाली बोलके, संगीता घोडके, संगीता निमसे, संगीता निगळे, मनीषा गोसावी, उज्ज्वला घोरपडे, सुरेखा बळीद, सविता नागरे, मनीषा क्षेत्रे, ज्योती करांडे, सविता तवले, प्रियंका खांदवे, शितल ससे, विनिता शिंदे, सुमन कडूस, वर्षा शिरसाठ, मेहमूदा मुजावर, सुलताना शेख, प्रतिभा देठे, सीमा गावडे आदिनी केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post