अखेर स्वीकृत नगरसेवकांच्या नावावर शिक्कामोर्तब...
नगर : अहमदनगर महानगरपालिकेच्या स्विकृत नगरसेवकपदाच्या निवडी आज जाहीर करण्यात आल्या आहेत. गटनेत्यांनी दिलेली नावे मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी मंजूर केल्यानंतर महापौर बाबासाहेब वाकळे यांनी स्वीकृत सदस्यांची नावे जाहीर केली आहेत. यात राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून विपुल शेटिया, डॉ.राजेश कातोरे, शिवसेनेकडून मदन आढाव व संग्राम शेळके तर भाजपकडून रामदास आंधळे यांची निवड झाली आहे.
शिवसेनेने मागील वेळी दिलेली नावेच कायम ठेवली. राष्ट्रवादीनेही विपुल शेटिया यांचे नाव कायम ठेवत डॉ.कातोरे यांनाही संधी दिली आहे. भाजपनेही मागील वेळीप्रमाणे पुन्हा रामदास आंधळे यांच्या नावाची शिफारस केली. स्वीकृत नगरसेवक निवडीवरुन मागील काही दिवसांपासून मोठे राजकारण सुरु होते. शिवसेनेतून काही पदाधिकार्यांनी संपर्कप्रमुखांना लक्ष्य करीत पक्षात जातीवाद होत असल्याचा आरोप केला होता. मात्र पक्षाने स्व.अनिल राठोड यांच्या काळात निश्चित झालेली नावं कायम ठेवली. भाजपकडून स्वीकृतसाठी सुवेंद्र गांधी तसेच किशोर डागवाले यांच्या नावाची चर्चा होती. परंतु, पक्षाने आंधळे यांना संधी दिली. राष्ट्रवादीकडून विपुल शेटिया यांच्याच नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
Post a Comment