स्वबळावर शिवसेनेचा भगवा...हे मी गेल्या 30 वर्षांपासून ऐकत आलोय

 स्वबळावर शिवसेनेचा भगवा...हे मी गेल्या 30 वर्षांपासून ऐकत आलोय

ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा शिवसेनेला खोचक टोलानाशिक: महाराष्ट्राच्या आगामी निवडणुकात शिवसेनेचा स्वबळावर भगवा फडकवण्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखांशी संवाद साधताना केलं. यावर बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेला खास शैलीत टोला लगावला. स्वबळावर भगवा फडकवणार हे मी गेल्या 30 वर्षांपासून ऐकत आलो आहे, अशा शब्दांत शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, शिवसेना स्वबळावर भगवा फडकवणार हे शिवसैनिकांना सांगत असेल. पण हे मी गेल्या 30 वर्षांपासून ऐकत आहे. महाविकास आघाडीतील सर्व पक्षाच्या नेत्यांना आपला पक्ष मोठं करण्याचं स्वातंत्र्य आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्था एकत्र लढवाव्या का? हा निर्णय इतर संबंधित पक्ष आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील घेतील. मात्र, भाजपला दूर ठेवण्यासाठी आपण एकत्र आलो आहेत, हे महाविकास आघाडीतील नेत्यांनी विसरू नये. महाविकस आघाडी सरकारला राज्यातील जनतेची पसंती आहे. जनतेच्या भल्यासाठी निर्णय घ्या, असा सल्ला देखील शरद पवार यांनी यावेळी दिला.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post