‘या’ कारणाने मला साखर कारखानदार आवर्जून कार्यक्रमाला बोलावतात

 ‘या’ कारणाने मला साखर कारखानदार आवर्जून कार्यक्रमाला बोलावतात

माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केला मोठा खुलासाअहमदनगर- साखर सम्राटांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या नगर जिल्ह्यात एकही साखर कारखाना नसताना माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांचा साखर सम्राटांमधील वट चांगलाच वाढला आहे. जिल्ह्यात विविध साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरु होत असून त्यासाठी माजी मंत्री कर्डिलंेंना विशेष आमंत्रित करून त्यांच्या हस्तेच गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात येत आहे. या बदलाची राजकीय वर्तुळात चर्चाही होत आहे. याबाबत स्वत: कर्डिले यांनीच मोठा खुलासा केला आहे. 

जिल्हा बँकेच्या माध्यमातून साखर कारखान्यांना भरीव मदत देण्याचा आम्ही प्रयतन करीत असतो. जिल्हा बँकेत  मी जेष्ठ संचालक असल्यामुळे माझा शब्द वाया जात नाही, याची सगळ्यांनाच माहिती झाल्यानं मला सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यक्रमांना आवर्जून बोलावले जात आहे, असे वक्तव्य त्यांनी केले. नगर तालुक्यातील कामरगाव येथे जिल्हा बँकेच्यावतीने शेतकर्‍यांना पशुधनासाठी खेळते भांडवल कर्ज वितरण वेळी ते बोलत होते.

जिल्हा सहकारी बँकेच्यावतीने आयोजित या कार्यक्रमात 7कोटी 54लाख खेळते भांडवल धनादेश वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे, बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे, उपसभापती संतोष म्हस्के, दिलीप भालसींग, गणेश साठे, तुकाराम कातारे, सुरेश सुंबे, रावसाहेब साठे, गणेश साठे, बाळासाहेब साठे, प्रकाश दळवी आदी उपस्थित होते.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post