माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत यावे

 माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत यावेजालना: एकनाथ खडसेंच्या माध्यमातून भाजपातून मोठे आऊटगोइंग झाल्यानंतर आणखी काही भाजप नेत्यांच्या पक्षबदलाची चर्चा सुरु झाली आहे. यातच शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी थेट भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनाच शिवसेनेत येण्याचे निमंत्रण दिले आहे. 

शिवसेना नेते अर्जुन खोतकर म्हणाले की, भाजपने जे पेरले तेच आता उगवत आहे. मागच्या पाच वर्षात भाजपने मेगा भरती केली, आता भाजपला उतरती कळा लागली आहे. एकनाथ खडसेंसारखे मोठे नेते आज राष्ट्रवादी पक्षात जात आहेत. त्यांच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. आजही भारतीय जनता पक्षात अनेक प्रमुख नेते नाराज आहेत . त्यांनी त्यांच्या बुध्दीप्रमाणे निर्णय घ्यावा आणि पक्षांतर करावे. पंकजा मुंडे जर आमच्या पक्षात आल्या तर त्याचा आम्हाला आनंद आहे. त्यांच्यासाठी आमच्या पक्षाची दारे नेहमीच खुली आहेत.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post