शहर शिवसेनेने जपली स्व.अनिल राठोड यांची नवरात्रीतील ‘ही’ प्रथा

 शहर शिवसेनेने जपली स्व.अनिल राठोड यांची नवरात्रीतील ‘ही’ प्रथानगर : शिवसेना उपनेते स्व.अनिल राठोड यांनी नवरात्रात सुरु केलेली एक प्रथा त्यांच्यानंतरही शिवसेनेने कायम ठेवली आहे. नवरात्रीच्या तिसर्‍या माळेला दरवर्षी राठोड शिवसैनिकांसह बुर्‍हाणनगरला जावून देवीच्या चरणी साडीचोळी अर्पण करीत असत. त्यांच्यानंतर शहर शिवसेनेने ही प्रथा कायम ठेवत तिसर्‍या माळेला देवीच दर्शन घेवून साडीचोळी अर्पण केली. यावेळी शहरप्रमुख दिलीप सातपुते, युवा सेनेचे विक्रम राठोड, संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर, योगीराज गाडे, मदन आढाव, गिरीश जाधव, आप्पा नळकांडे, सचिन शिंदे, संजय शेंडगे, दत्ता कावरे, अमोल येवले, संतोष गेनप्पा, काका शेळके ,अरुणा गोयल,रवी वाकळे, अभिषेक भोसले, दीपक कावळे, सुमित धेंड आदी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post