जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या चेअरमनपदी अरुण जोर्वेकर यांची निवड

 जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या चेअरमनपदी अरुण जोर्वेकर यांची निवडअहमदनगर : अहमदनगर  जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या चेअरमनपदी अरुण जोर्वेकर यांची निवड झाली. पदाधिकारी निवडीसाठी  जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था दिग्विजय आहेर यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत चेअरमनपदासाठी अरुण जोर्वेकर यांच्या नावाची सुचना संचालक विलास वाघ यांनी मांडली. सदर सुचनेस अनुमोदन संचालक वालचंद ढवळे यांनी दिले. त्यानुसार जोर्वेकर यांची चेअरमनपदी निवड करण्यात आली. निवड प्रक्रियेवेळी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे वरिष्ठ सहाय्यक व्हि.के.मुटकुळे, संस्थेचे व्यवस्थापक राजेंद्र पवार  व उपव्यवस्थापक प्रशांत लोखंडे यांनी सहकार्य केले.
जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर म्हणाले की, जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीने चांगल्या कामकाजातून वेगळेपण सिध्द केले आहे. सभासद हित लक्षात ठेवून तसेच शासकीय नियमानुसार संस्थेचा कारभार चालू आहे हे पाहून आनंद होतो. संस्था उत्तरोत्तर प्रगती साधेल असा विश्वास वाटतो.
या निवडीनंतर बोलताना चेअरमन अरूण जोर्वेकर म्हणाले की, श्री गणेश पॅनलनं निवडणुकीत दिलेली जवळपास सर्व आश्वासने पूर्ण करून सभासद हिताचा कारभार केला आहे. संस्था कॅश क्रेडिट मुक्त केली आहे. सभासदांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरविण्यात आमच्या पॅनलला यश आले आहे. मावळत्या चेअरमन इंदू गोडसे यांनी करोना काळात सभासदांच्या हिताचे चांगले निर्णय घेतले. पुढील काळातही उत्तम कारभाराची परंपरा चालू ठेवणार असून चेअरमनपदावरून उत्कृष्ट काम करून दाखवू. भविष्यात संस्थेचे सर्व व्यवहार ऑनलाईन करण्याचा व कमीतकमी व्याजदरात सभासदांना कर्ज वाटप करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
व्हा.चेअरमन प्रताप गांगर्डे म्हणाले की, जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटी सभासदांसाठी कामधेनू आहे. संस्थेचा कारभार करताना सभासदांचे हित केंद्रस्थानी ठेवून निर्णय घेतले जातात. आपल्या कार्यकाळात अनेक चांगले निर्णय घेवून त्याची अंमलबजावणी करता आली असून ही घोडदौड आगामी काळातही कायम राखण्याचा प्रयत्न करू.
सदर प्रसंगी संस्थेचे व्हा.चेअरमन प्रताप गांगर्डे, संचालक संजय कडुस, सुभाष कराळे, भरत घुगे, सोपान हरदास , संतोष नलगे, संजु चौधरी, अरुण शिरसाठ,  ज्ञानदेव जवणे, हरी शेळके, मोहन जायभाये, नारायण बोराडे, इंदु गोडसे, उषा देशमुख, शशिकांत रासकर, अशोक काळापहाड,विलास शेळके,कैलास डावरे  कर्मचारी वृंद उपस्थित होते.

Attachments area

Attachments area

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post