...तर संपूर्ण महाराष्ट्रातील वंजारी समाज पेटून उठेल

...तर संपूर्ण महाराष्ट्रातील वंजारी समाज पेटून उठेल

 जय भगवान महासंघाचा सेनेचा शिवसेनेला इशारा
अहमदनगर (प्रतिनिधी)- शिवसेनेच्या पक्षांतर्गत बैठकित एका युवा सेनेच्या पदाधिकार्‍याने वंजारी समाजाबद्दल केलेले वक्तव्य निषेधार्ह असून, या घटनेबद्दल समाजाच्या भावना तीव्र असताना शिवसेनेचे जिल्हाध्यक्षांसह इतर पदाधिकारी या विषयाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप जय भगवान महासंघाचे जिल्हाध्यक्ष रमेश सानप यांनी केला.  संबंधीत युवा सेनेच्या पदाधिकार्‍याने समाजाची माफी मागून प्रकरण मिटवावे. अशा जातीयवादी घटनेकडे दुर्लक्ष केले गेल्यास संपुर्ण महाराष्ट्रात वंजारी समाज पेटून उठणार असून, आंदोलनाची ठिणगी नगरमधून पडणार असल्याचा इशारा  महासंघाच्या वतीने देण्यात आला आहे.
 जय भगवान महासंघाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष सानप बोलत होते. शिवसेनेच्या सभासद नोंदणी कार्यक्रमात खुर्च्यांची फेकाफेक होऊन युवा सेनेच्या एका पदाधिकार्‍याने पक्षाचे उपजिल्हाप्रमुख आनंद लहामगे यांना मारण्याची व वंजारी समाजाबद्दल जातीवाचक शब्द वापरल्याने वादाला तोंड फुटले आहे. तर जातीयवादी शाब्दिक चकमकीवरुन वंजारी समाज विरुध्द शिवसेना हा वाद उफाळण्याची चिन्हे दिसत आहे. समाजाबद्दल चुकीचे वक्तव्य करणार्‍या सदर पदाधिकार्‍याची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी महासंघाने केली आहे. झालेल्या पत्रकार परिषद प्रसंगी महासंघाचे संपर्क प्रमुख श्रीकांत चेमटे, जिल्हा उपाध्यक्ष मदन पालवे, बंटी ढापसे, शिवाजी पालवे, शरद मुर्तडकर, विकी वायभासे, शशीकांत सोनवणे, सुभाष निंबाळकर, संजय पाटेकर आदिंसह महासंघाचे पदाधिकारी व वंजारी समाजाचे ज्येष्ठ व्यक्ती उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post