राज्यात सरकार स्थापन करताना केंद्राला विचारले होते का?

 राज्यात सरकार स्थापन करताना केंद्राला विचारले होते का?

माजी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची ठाकरे सरकारवर टीकाअहमदनगर : “केंद्र सरकारवर टीका करणे म्हणजे आपले स्वतःचे अपयश झाकायचे आणि केंद्राकडे बोट दाखवायचे, असा हा प्रकार आहे. जर तुमच्यात राज्य चालवायची धमक आहे तर मग केंद्राकडे बोट का दाखवता?”, असा सवाल भाजप नेते माजी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी ठाकरे सरकारला केला आहे.  महाविकास आघाडी स्थापन करताना तुम्ही काय केंद्राला विचारलं होतं का?, असा सवाल करत तुम्ही सर्व तत्व पायदळी तुडवून सत्ता स्थापन केलीये. तर मग सत्ता टिकवण्याचे तुमचे काम आहे, असं विखे म्हणाले.

केंद्र सरकारवर टीका करणे म्हणजे आपले स्वतःचे अपयश झाकायचे आणि केंद्राकडे बोट दाखवायचे असा प्रकार आहे. तुम्ही राज्यातील जनतेसाठी स्वत: काय करणार, हे आधी राज्यातील जनतेला सांगा, असं विखे पाटील म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post